शहागंज येथे युवक काँग्रेसने साजरा केला बेरोजगार दिवस म्हणून मोदींचा वाढदिवस...

युवक काँग्रेसने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून मोदींचा वाढदिवस...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार दिवस दिन म्हणून राज्यात प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शासकीय नोकरी मिळत नसल्याने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना राहुन सत्तेत अकरा वर्षे झाली तरी आश्वासन पूर्ण केले नसल्याने युवक काँग्रेसच्या वतीने शहागंज येथील गांधी भवन समोर चहा विकून निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलिम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. पदवी़धरांनी पदवीचे पोषाख परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला. फळविक्रेत्यांना यावेळी कार्यकर्त्यांनी दहा रुपयांमध्ये चहाची विक्री केली.
याप्रसंगी मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारी नोक-या उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव अॅड सय्यद अक्रम, इंटकचे शहराध्यक्ष शेख अथर, प्रदेश प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, शहर सरचिटणीस मुजफ्फर खान, अखिल पटेल, युवक काँग्रेसचे मध्य विधानसभेचे अध्यक्ष शेख फैज, पूर्व विधानसभेचे अध्यक्ष सुफीयान पठाण, मजाज खान, अब्दुल माजिद, योगेश थोरात, साहेबराव बनकर, मो.एहतेशाम खान, फैसल पटेल, आमेर पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






