सावंगी बायपासवरील फंक्शन हाॅल येथे बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश...!
दामिनी पथकाला सावंगी बायपास, केंब्रिज चौकाजवळ रोझ फंक्शन हाॅल येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. मुलगी फुलेनगर हर्सुल नवरीच्या वेषभुषेत दिसून आली. महिला बालविकास विभागाचे नितेश दुर्वे यांनी आधार कार्ड व जन्म तारखेचा दाखला चेक केले. ती मुलगी अल्पवयीन दिसून आली. नवरदेव व नवरीच्या आई वडीलांना बालविवाहचे महत्व दामिनी पथक व उपस्थित अधिकारी यांनी समजावून सांगितले. हा बालविवाह रोखून उद्या महिला व बालविकास समीती समक्ष सकाळी 11 वाजता मुलीचे कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याची समज दिली.
नगरसेवक मतीन पटेल व काकासाहेब काकडे व इतर नागरीकांनी हा बालविवाह रोखण्यासाठी मध्यस्थी करुन दामिनी पथकाला सहकार्य केले. यावेळी कोणत्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही.
फंक्शन हाॅल येथे दिड ते दोन हजार व-हाडी मंडळी उपस्थित होती. त्यांना व्यवस्थित जेवण करून घेण्यासाठी आवाहन केले. सदरील कारवाई दामिनी पथकाचे अनिता शिंदे, कल्पना खरात, निर्मला निंभोरे, सुनिता नागलोद, सरिता कुंडारे, चालक दिनेश गर्जे, नितीन पठारे यांनी केली आहे
.
What's Your Reaction?