सावधान...गॅस रिफीलिंगसाठी KYC करुन घ्या...एजंसीवर सिलेंडरची टंचाई

 0
सावधान...गॅस रिफीलिंगसाठी KYC करुन घ्या...एजंसीवर सिलेंडरची टंचाई

सावधान...गॅस रिफीलिंगसाठी KYC करुन घ्या...एजंसीवर सिलेंडरची टंचाई

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज) शहरातील गॅस एजन्सीवर गॅस रिफिलिंगची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांना गॅस रिफिलिंग न करता परत यावे लागत आहे. यशोधरा काॅलनी येथे ग्राहकांनी गर्दी केली होती. 1 ऑगस्ट पासून ज्या ग्राहकांनी आपल्या गॅस जोडनिचे KYC केले नसल्याने गोडाऊन मधून ज्यांनी गॅस बुकींग केले त्यांनाही परत यावे लागत असल्याने ग्राहकांची पंचायत झाली आहे. एका ग्राहकाने सांगितले आज गॅस बुकींग केले तरी स्टाॅक नसल्याने परत जावे लागत आहे दुपारी यावे असे एजंसीवर सांगितले. शहरात राॅकेल मिळत नाही जेवन कशावर बणवायचे हा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. ज्या ग्राहकांनी KYC केली नाही त्यांना सिलेंडर मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow