मराठवाड्यातील काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांची झाली बैठक, समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

 0
मराठवाड्यातील काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांची झाली बैठक, समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

मराठवाड्यातील मुस्लिम नेत्यांची झाली बैठक, समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने समाजात नाराजी यांचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत पडू नये या विषयावर बैठकीत चर्चा झाली...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसच्या वतीने मुस्लिम नेत्यांना उमेदवारी मिळावी, पक्ष संघटनेत महत्वाची जवाबदारी द्यावी या मागणीसाठी पक्षावर दबावगट निर्माण करण्यासाठी आज मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रमुख मुस्लिम नेत्यांची महत्वाची बैठक एका हाॅटेलात पार पाडली.

या बैठकीत माजी आमदार एम.एम.शेख, माजी आमदार सिराज देशमुख, लातूरचे माजी उपमहापौर मोईज शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष हमद चाऊस, औरंगाबाद शहराध्यक्ष युसुफ शेख, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद खलील, नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार शेख, उपमहापौर मसूद शेख, हिंगोलीचे प्रदेश सरचिटणीस हाफिज शेख, प्रदेश सचिव खालेद पठाण, प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद, सिल्लोड, शकील मौलवी, औरंगाबादचे माजी महापौर रशीद मामू, आरेफ शेख, डॉ.सरताज पठाण, माजी नगरसेवक नादेरुल्लाह हुसेनी, उपनगराध्यक्ष मोईनोद्दीन पठाण, मुहिब अहेमद, हमीद नवाज अख्तर, अयूब शेख, माजी नगरसेवक शेर अली, नांदेड, शहर जिल्हाध्यक्ष परभणी नदीम इनामदार, फरीद देशमुख, गुलाब पटेल, मजहर पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow