9 दुकानांतून प्रतिबंधित 75 किलो प्लॅस्टिक जप्त, 45 हजार रुपये दंड वसूल

 0
9 दुकानांतून प्रतिबंधित 75  किलो प्लॅस्टिक जप्त, 45 हजार रुपये दंड वसूल

9 दुकानांतून प्रतिबंधित 75 किलो प्लॅस्टिक जप्त

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिक कारवाई करण्यात येत आहे.

 आज झोन 2 अंतर्गत अंगुरीबाग येथील 23 प्लॅस्टिक विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. यात 9 दुकानामध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सबंधित प्लॅस्टिक विक्रेत्यांकडून एकूण 75 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात येऊन त्यांचे कडून 45000/- रुपये दंड वसूल करण्यात आला.

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण विभाग अधिकारी कोसे ,लोखंडे, नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow