EWS घरकुल अर्जासाठी आणखी एक महीन्याची मुदतवाढ देण्याची मागणी

 0
EWS घरकुल अर्जासाठी आणखी एक महीन्याची मुदतवाढ देण्याची मागणी

EWS घरकुल अर्जासाठी आणखी महिनाभर मुदतवाढ द्या

अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना सैय्यद अशफाक अली यांचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14 (डि-24 न्यूज) —महापालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) घरकुल अर्ज भरण्याची मुदत आणखी किमान एक महिन्याने वाढविण्याची मागणी काँग्रेस माथाडी कामगार महाराष्ट्रचे मराठवाडा सरचिटणीस सैय्यद अशफाक अली यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.

EWS घरकुलासाठी अर्ज भरण्याची सुरुवातीची मुदत 23 जुलै ते 6 ऑगस्ट 2026 अशी होती. नागरिकांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढविली. मात्र, अद्यापही अनेक पात्र लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने ही मुदत अपुरी ठरत असल्याचे अशफाक अली यांनी निवेदनात म्हटले आहे.

उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड अपडेट तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांना वेळ लागत आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अनेक पात्र नागरिकांना अर्ज करता आलेले नाहीत. परिणामी गरजू लाभार्थी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

“मुदत संपल्याने पात्र नागरिक वंचित राहू नयेत”

सैय्यद अशफाक अली म्हणाले, “महानगरपालिकेने नागरिकांच्या मागणीचा विचार करून अर्जाची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढविली, त्याबद्दल प्रशासनाचे आभार. मात्र, अजूनही अनेक पात्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. केवळ मुदत संपल्यामुळे कोणताही पात्र नागरिक घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये.”

प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन 15 ऑगस्टनंतर आणखी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुदतवाढ मिळाल्यास अधिकाधिक पात्र नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळेल आणि योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना निवेदन देताना नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अशफाक अली यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow