पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत किती उमेदवार मैदानात, वाचा हि बातमी...

 0
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत किती उमेदवार मैदानात, वाचा हि बातमी...

पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026

अर्ज माघारीनंतर आता 41 उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026 ची प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाअखेर एकूण 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 41 उमेदवार आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पदवीधर मतदार संघ निवडणूकीसंदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पत्रकार परिषदेस विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी संबोधित केले. सह आयुक्त श्रीमती मंजूषा मिसकर यावेळी उपस्थित होत्या. 

पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली की, यानिवडणूकीसाठी 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी दि.29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर या कालावधीत 62 उमेदवारांनी 92 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दि.7 रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेअंती 8 उमेदवारांचे नामनिर्देश अवैध घोषीत करण्यात आले. एकूण 54 उमेदवारांचे नामनिरेशन पत्र वैध घोषीत करण्यात आले. दि.8 रोजी एका तर दि.9 रोजी 12 अशा एकूण 13 जणांनी आपले नामनिर्देशन मागे घेऊन आपली उमेदवारी माघारी घेतली. आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 41 आहे.

या निवडणूकीसाठी एकूण 3 लाख 26 हजार 701 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 77 हजार 717 महिला, 2 लाख 48 हजार 971 पुरुष आणि 13 इतर असे मतदार आहेत. एकूण 842 मतदान केंद्र असून 935 केंद्राध्यक्ष व 2814 मतदान अधिकारी आहेत. मतदान दि.23 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळात होणार असून मतमोजणी दि.27 रोजी वुडस्टर्म डेकार एमआयडीसी चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 4455 अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्याट आले असून निरीक्षक म्हणून श्रीमती माधवी खोडे- चावरे यांची नियुक्ती आहे. तर रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9822366519 असा आहे. या निवडणूकीतील मतदान हे मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार अस्ते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मदत कक्ष तयार करण्यात आला असून त्याचा क्रमांक 0240-2343164 असा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow