व्हॅलेंटाईन डे निमित्ताने महात्मा फुले समता परिषदेने मुख्यमंत्री यांना पाठवला प्रेमाचा संदेश

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने महात्मा फुले समता परिषदेने मुख्यमंत्री यांना पाठविला प्रेमाचा संदेश...
क्रांतीचौकात मराठा ओबीसी समाज आमनेसामने... पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत...
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज ) आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,
आज जगभरात व्हॅलेंटाईन डे च्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तींना प्रेमाचा संदेश दिला जात असून त्यांच्या बद्दल प्रेमाची भावना व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे पर्यायाने सर्व समाजातील जनतेचे नेतृत्व करीत आहात व सर्व जनतेच्या न्याय हक्कांचे संरक्षण करणे हे आपले सुध्दा कर्तव्य आहे.
सध्याच्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर आपण 26 जानेवारी 2024 रोजी शासन अध्यादेश-अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट-सगेसोयरे या व्याख्येखाली ओबीसी समाजात घुसवण्याचा व त्या अर्थी समस्त ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतांना प्रथम दर्शनी दिसत आहे.
आपल्या या निर्णयामुळे सर्व ओबीसी समाज दुखावला गेला असून आजच्या या प्रेमाच्या दिवशी आम्हीं आपणांस प्रेमाचा संदेश देवून आपण हि या सर्व ओबीसी समाजावर प्रेम करावे व आम्हां ओबीसी बांधवांवर अन्याय करू नये असा प्रस्ताव देवून आपणांस प्रपोज करीत आहोत. आमच्या प्रेमाचा स्वीकार करावा हि विनंती.
सकाळी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हवेत फुगे सोडून पाठविलेल्या या अनोख्या संदेशाने क्रांती चौकात एकचं वेगळेच वातावरण झाले होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या संकल्पनेतुन या अनोख्या संदेशाने काही काळ वातावरण तंग झाले होते कारण काही मराठा समाज बांधव या शांततामय चालू असलेल्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत होते परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कार्यक्रमास गालबोट लागले नाही. तरीही दोन्हीं बाजुंनी घोषणाबाजी चालूच होती.
महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमास मराठवाडा संघटक एल.एम.पवार, जिल्हा समन्वयक निशांत पवार, जिल्हा सरचिटणीस सुरेश बनसोड, शहराध्यक्ष गणेश काळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप घोडके, अजिनाथ खिल्लारे, अर्जुन सोनवणे, लक्ष्मण हेकडे, ज्ञानेश्वर जेजुरकर, सोपान दारवंटे, कल्याण रंधे, अनिल घोडके, डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, साळूबा पांडव, शशिकला खोबरे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी जय ज्योती जय क्रांती, एकचं पर्व ओबीसी सर्व, येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला.
What's Your Reaction?






