पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांचा राडा, सुरक्षारक्षकांनी काढले बाहेर...
सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ, महापौरांनी दिले बाहेर काढण्याचे आदेश...!
उध्दव ठाकरे यांनी सोडवला शहराचा पाणी प्रश्न - नगरसेवक सचिन खैरे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सकाळी राडा बघायला मिळाला. महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सुरुवातीला शिवसेना उबाठाचे नगरसेवक सचिन खैरे यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे श्रेय आहे. त्यांनी हि योजना शहरासाठी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. विद्यमान सरकारने श्रेय घेऊ नये. उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात घ्यावा अशी मागणी खैरे यांनी करताच गोंधळ उडाला. महापौर यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर सचिन खैरे, माजी महापौर रशीद खान मामू, गटनेते गणेश लोखंडे, नगरसेविका श्रीमती सावित्रीबाई वाणी असे सहा नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. महापौर समीर राजूरकर यांनी शिवसेनेच्या सर्व सहा सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. यावेळी काही काळ सुरक्षारक्षक व नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. पहील्याच सर्वसाधारण सभेत राडा बघायला मिळाले.
What's Your Reaction?