शहराच्या नामांतरावरुन एमआयएमच्या नगरसेवकांचा गदारोळ, सर्व सदस्यांचा सभात्याग...!
एमआयएमच्या नगरसेवकांचा नामांतरावरुन गदारोळ करत सभात्याग...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी नामांतरावरुन सभागृहात गोंधळ करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दुपारी एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी प्रशासनावर हिटलरशाहीचा आरोप करत सभागृहातून सभात्याग केला. भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांनी पाणी योजनेचे श्रेय विद्यमान सरकारचे आहे म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर शिवसेना उठावाच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. उध्दव ठाकरे यांचे हे श्रेय आहे त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडावा अशी मागणी करताच महापौरांनी उठावाच्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत उबाठा व एमआयएमच्या सदस्यांचा गदारोळ पाहायला मिळाला.
महापौरांनी बाहेर कारवाईचा उठावाच्या सदस्यांनी निषेध केला.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेतले जाते. त्याचप्रमाणे शहराच्या अस्मितेशी जोडलेल्या नामांतराच्या विषयावरही जनतेचे मत जाणून घ्यायला हवे होते. मुंबईत बसून दोन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शहरावर लादण्यात आला हि सरळ सरळ हिटलरशाही म्हणत सभात्याग केला.
सदस्यांनी सभागृहात सांगितले शहराला नामांतर व पुतळ्याची गरज नाही तर पायाभूत सुविधा, पाणी, चांगले रस्ते, दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा पाहिजे. जे विषय आजच्या सर्वसाधारण सभेत आणले गेले त्यामुळे शहरातील जनतेला काय लाभ मिळणार आहे. पुतळे बणवायचे असतील तर लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पैशातून उभारावे जनतेच्या कराच्या पैशातून कशाला पुतळे उभारता, भावनिक मुद्यांवर वेळ वाया घालवत असल्याचा आरोप समीर साजिद बिल्डर यांनी केला. उबाठा व एमआयएमच्या सदस्यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. सूचना देऊनही गोंधळ थांबला नाही आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सभागृहात खडाजंगी
झाली.
What's Your Reaction?