बंगलूरु येथील प्रख्यात धर्मगुरू मौलाना हकीम नसिमोद्दीन सिद्दीकी रहेमानी यांचे निधन...
बंगलूरु येथील प्रख्यात धर्मगुरू मौलाना कारी हकीम नसीमुद्दीन सिद्दीकी रहमानी यांचे निधन
उद्या बंगलूरु येथे होईल दफनविधी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) : मुस्लिम समाजातील ज्येष्ठ धर्मगुरू, आध्यात्मिक मार्गदर्शक व धर्मप्रसारक हजरत अक्दस मौलाना कारी हकीम नसीमुद्दीन सिद्दीकी रहमानी गयावी, बंगळुरू यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मौलाना नसीमुद्दीन रहमानी यांनी तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ दीन-ए-हकचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी आध्यात्मिकतेच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. अनेक जिवंत औलियांच्या सहवासातून त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादन केले होते. ते हजरत मौलाना मोहम्मद अहमद प्रतापगढी रहमतुल्लाह अलैह यांचे खलिफा होते.
मूळचे बिहार राज्यातील गया येथील असलेले मौलाना रहमानी यांचे वास्तव्य बंगळुरू येथे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा पुत्र व दोन कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पुत्रांमध्ये हाफिज अब्दुल्ला, कारी अब्दुल कदीर, मुफ्ती जुनैद कासमी, मौलाना जकरिया कासमी, हाफिज मोहम्मद अली आणि मुफ्ती अबूबकर कासमी यांचा समावेश आहे.
त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, अल्लाह तआलाने त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान प्रदान करावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.हाफिज इम्रान यांनी दिली आहे.
What's Your Reaction?