वीज पडून एक शेतकरी व आठ जनावरे दगावली, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
वीज पडून एक शेतकरी व आठ जनावरे दगावली, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) अवकाळी पावसाने सिल्लोड व पैठण तालुक्यात धुमाकूळ माजवला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी उन पडले आहे. औरंगाबाद शहरात उन कधी ढगाळ वातावरण होते. अवकाळी पाऊस, सुसाट वारा व वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर आठ जनावरे दगावली आहेत. अशी माहिती डि-24 न्यूजला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत आहे यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पैठण तालुक्यातील मौजे टाकळी, सुधाकर धोंडीबा पाचे, अंदाजे वय 60 यांचा विज पडून मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील इंदेगाव येथे विज पडून दोन बैल मृत्यूमुखी पडले. विहामांडवा येथे दोन बैल, मौजे टाकळी तीन बक-या व दोन करडांचा मृत्यू झाला आहे. पैठण शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, अंभईत येथे मेघ गर्जनेसह पाऊस, हट्टी येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. देवगाव रंगारीत पाऊस सुरू आहे. गल्लेबोरगावात रिमझिम पाऊस, अंधारीत सुध्दा ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू आहे.
What's Your Reaction?