सामुहिक अजान देत मुस्लिम समाजाने पाळला काळा दिवस
सामुहिक अजान देत बाबरी मस्जिद घटनेचा निषेधार्थ काळा दिवस
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6 डिसेंबर(डि-24 न्यूज) चंपाचौकात मोठ्या पोलिस बंदोबस्तात दरवर्षीप्रमाणे रजा अकादमीच्या वतीने 6 डिसेंबर काळा दिवस पाळला जातो. काळे कपडे परिधान करून दंडावर काळी फित लावून बाबरी मस्जिद पाडल्याचा मुस्लिम समुदायाने निषेध करत काळा दिवस पाळला. दुपारी 3.40 वाजता मौलाना शाहनूर खान रझवी यांच्या पाठीमागे सामुहिक अजान पठण करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते. अजान नंतर बाबरी मस्जिद शहीद झाली होती तो इतिहास येणाऱ्या पिढीला आठवणीत राहावे यासाठी मागिल 33 वर्षांपासून चंपाचौकात अजानचे आयोजन करुन काळा दिवस पाळला जातो. अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी हाफिज आरीफ नुरी, मोहम्मद हुसेन रजा, एरोज रजा, सरफराज मेमन, जावेद कुरैशी, शहानवाज खान, मोहम्मद ताहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?