अंबादास दानवेंना ईव्हीएम हॅक करण्यासाठी मागितले अडीच कोटी, पोलिसांनी आरोपिला ठोकल्या बेड्या...!
अंबादास दानवेंना ईव्हीएम हॅक करतो अडीच कोटी द्या म्हटले आणि पोलिसांनी ठोकल्या आरोपिला बेड्या
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्या आरोपिला पोलिसांनी शहरात बेड्या ठोकल्या आहेत. त्या आरोपिला एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले आहे. दानवेंच्या भावाने सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे आरोपिचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेने हि कारवाई केली आहे. ढाकणे हा अहमदनगर जिल्ह्यातील रहीवाशी आहे. त्याने अंबादास दानवे यांना फोन करून औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत सर्व ईव्हीएम हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो असे म्हटले होते. ढाकणे हा सैन्यात हवालदार म्हणून नोकरीला आहे. त्याच्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे अशी माहिती मिळत आहे. अडीच कोटींची मागणी केल्याने दानवेंनी तक्रार केली. अंबादास दानवेंना पोलिसांनी पैसे दिले. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील माॅर्डन हाॅटेलमध्ये ढाकणेला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंबादास दानवे यांनी डि-24 न्यूजला सांगितले पाच ते सहा महीन्यांपासून तो मला फोन करत होता. आपल्या वोटींग मशिनमध्ये चीप बसवून त्या हॅक करतो त्यात पाहिजे तसे मतदान करुन घेतो. असे सांगितले होते. मात्र या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. हे मला माहीत होते. त्याने माझ्याकडे अडीच कोटींची मागणी केली. मी मुद्दामहून पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. माझी त्याच्याशी काही ओळख नाही दुष्मनी नाही. ईव्हीएम मशिन बाबत जनतेमध्ये संभ्रम असेल. अशा प्रकाराने लोकांचा संभ्रम वाढतो. तो संभ्रम कमी करण्याची जवाबदारी या देशाचा एक नागरिक म्हणून मला वाटली. ती मी तक्रार करुन पार पाडली असे दानवे म्हणाले.
What's Your Reaction?