अखेर इंडिया आघाडी रस्त्यावर, मोदी सरकारच्या विरोधात केले अक्रामक आंदोलन

 0
अखेर इंडिया आघाडी रस्त्यावर, मोदी सरकारच्या विरोधात केले अक्रामक आंदोलन

भाजप सरकारने 146 खासदारांचे निलंबन केल्याने इंडिया आघाडीच्या वतीने क्रांतीचौक येथे भाजप सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन  

औरंगाबाद,दि.22(डि-24 न्यूज) मोदी सरकारने लोकशाहीचा गळा दाबवण्याचा काम केले व हिटलर शाही सारखे वागुन संसदेत ज्या व्यक्तीने घुसुन स्मोक हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून खासदारांनी सुरक्षेची चुक लक्षात आणून देण्यासाठी आवाज उठवला म्हणून मोदी सरकारने एका मागे एक इतिहासात पहिल्यांदा एवढया मोठया संख्येने 146 खासदारांचे निलबंन करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज इंडिया आघाडी व सर्व प्रमुख घटक पक्षांच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात कांतीचौक येथे तीव्र आंदोलन करुन मोदी सरकाच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणुन सोडला. 

यावेळी भाजपा, आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी करत हातात पोस्टर घेत आपल्या पक्षांचे झेंडे हातात घेत पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

 यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी मंत्री अनिल पटेल, मा.आ.नामदेवराव पवार, सिपीआयचे अशफाक सलामी, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष फैसल खान, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, सिपीआयचे अ‍ॅड.अभय टाकसाळ, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, राष्ट्रवादीचे मुश्ताक अहेमद, अभिषेक देशमुख, काॅ.बुध्दीनाथ बराळ, महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमा पाटील, महिला शहर कॉग्रेसच्या शहर अध्यक्षा दिपाली मिसाळ, अ‍ॅड.इकबालसिंग गिल, किरण पाटील डोणगांवकर, आकेफ रजवी, गौरव जैस्वाल, अतिश पितळे, मोहित जाधव, डॉ.पवन डोंगरे, एड सय्यद अक्रम, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर, अनिता भंडारी, विदया घोरपडे, कॉ.भास्कर लहाने, भिमराव बनसोडे, उमाकांत खोतकर, भगवान भोजने, उमाकांत राठोड, प्रकाश पाटील, श्रीकांत पोपसे, अजय भवलकर, राजू हिवाळे, बाबासाहेब वावळ, महेंद्र रमंडवाल, समाजवादीचे शेख रौफ, मोईन फारुकी, शिवसेनेचे बाळासाहेब थोरात, प्रतिभा जगताप, ज्ञानेश्वर डांगे, गोपाळ कुलकर्णी, अशोक शिंदे, बाळासाहेब गडवे, संजय हरणे, सुरेश व्यवहारे, शेख रब्बानी, संदीप हिरे, समीर कुरेशी, शेख आसेफ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow