अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश
 
                                अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.17(डि-24 न्यूज) जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. आज अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असल्याने शहरात या पक्षाची ताकत वाढत आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रं.1, हर्सुल यासिननगर येथील शेख अन्वर व त्यांचे सोबत काही कार्यकर्त्यांनी बुथ प्रमुख मोहम्मद हबीब(मुन्नाभाई) यांच्या संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना सन्मान देत वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेत पक्षात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी औरंगाबाद मध्य विधानसभा अध्यक्ष मोहम्मद रजी, प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख अलीम, जिल्हा सचिव राजू मिसाळ, शहर सचिव गुड्डू भाई आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            