आजपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात, उद्या पहिला रोजा...

 0
आजपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात, उद्या पहिला रोजा...

आजपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात, उद्या पहिला रोजा...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - आज सायंकाळी भारतात चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात आजपासून झाली आहे. यामुळे मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सोशलमिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत. आज रात्री आठ वाजेपासून तरावीहची नमाज सर्व मस्जिद मध्ये अदा करण्यात आली. पहाटे गुरुवारी सहेरी असणार आहे. पहाटे 5 वाजून 44 वाजेपर्यंत पहील्या रोजासाठी सहेरी करु शकतात. सायंकाळी 6.45 वाजता रोजेदार इफ्तार करतील. यामध्ये जेष्ठ नागरिक, महीला, छोटे बालक सुद्धा रोजा ठेवतात. शहरात विद्युत रौशनाई लावून माहे रमजानचे स्वागत करण्यात आले. विविध स्पेशल पदार्थ हैदराबादी हरिस, नान खलिया, बिर्याणी, देश विदेशातील नवनवीन डिश बनवण्यासाठी बाजारपेठे सजली आहे. बाजारपेठेत सर्व प्रकारची फळे इफ्तारसाठी व्यापा-यांनी साठा केला आहे. पेंड खजूरची शेकडो ब्राण्ड देश विदेशातील विक्रीसाठी आली आहे. खरेदीसाठी आत्तापासूनच खवय्यांची गर्दी बाजारपेठेत होत आहे. सर्व जाती धर्मातील लोक मुस्लिम समाजाला पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत भाईचारा व बंधूभावाचा संदेश देत आहे. मुस्लिम बांधव महीनाभर रोजे ठेवून अल्लाहची इबादत करतात

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow