"आनंदाचा शिधा" चे शिधासंच प्राप्त होताच होईल वितरण, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची माहिती

 0
"आनंदाचा शिधा" चे शिधासंच प्राप्त होताच होईल वितरण, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची माहिती

‘आनंदाचा शिधा’चे शिधासंच प्राप्त होताच होईल वितरण

छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज)- गौरी गणपती उत्सवानिमित्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करावयाचे ‘आनंदाचा शिधा’चे शिधा संच अद्याप पूर्ण प्राप्त नसल्याने त्याचे वितरण होत नसून पूर्ण शिधासंच प्राप्त होताच वितरण सुरु करण्यात येईल,असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळविले आहे.

 याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्‍यातील सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थ अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमीत्त 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ 1 किलो, रवा 1 किलो हे चार जिन्‍नस समाविष्‍ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ शिधाजिन्‍नस संच वितरीत करण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे. जिल्ह्याकरीता गौरी गणपती उत्सवानिमीत्त मंजूर शिधाजिन्नस संच नियतना पैकी 25 टक्के शिधा संच अद्यापपर्यंत शासन नियुक्त कंत्राटदारा मार्फत प्राप्त झाला आहे. उर्वरित शिधा संच प्राप्त होताच वितरण करण्यात येईल. याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालया मार्फत सबंधीत कंत्राटदार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात येत आहे. आनंदाचा शिधा सर्व संच प्राप्त होताच रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांना सत्वर वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow