आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 7 हजार गरजू महिलांना दिवाळी शिधा वाटप...

 0
आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 7 हजार गरजू महिलांना दिवाळी शिधा वाटप...

दुष्काळात सर्वसामान्यांची दिवाळी गोड; शिवसेनेचा उपक्रम...

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 7 हजार गरजू महिलांना दिवाळी शिधा वाटप

सिल्लोड, दि.7 (डि-24 न्यूज)- यंदा सिल्लोड–सोयगाव मतदारसंघात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, सर्वसामान्य कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने 'दिवाळी शिधा' वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमांतर्गत सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 7 हजार गरजू महिलांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी कुणीही खचून जाऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्यासह संपूर्ण राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली. 

संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वांना दीपावली, पाडवा व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाढे, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, देविदास पालोदकर, राजूबाबा काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, राजश्रीताई निकम, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शहा, लताबाई जाधव, गीताबाई धाडगे, देविदास लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, प्रताप प्रशाद, नंदकिशोर सहारे, अशोक सूर्यवंशी, विश्वासराव दाभाडे, डॉ. दिनेश साळवे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, शेख जावेद, धैर्यशील तायडे, सयाजीराव वाघ, राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, मधुकर गवळी, गणेश ढोरमारे, सचिन पाखरे, पप्पू जगनाडे, लक्ष्मण जगताप, मुरलीधर शेजुळ, प्रवीण मीरकर, शिवा टोम्पे, संदीप राऊत, प्रशांत क्षीरसागर, अंबादास शिंदे, अरविंद शिंदे, रउफ बागवान, प्रशांत जोशी, अशोक बनसोड, शेख इमरान (गुड्डू), राजू गौर, डॉ. फेरोज खान, विजय खाजेकर, दिलीप जाधव, अमोल साळवे, विशाल जाधव, शेख बाबर, गौरव सहारे, संतोष खैरनार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow