आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील महायुती एकवटली
आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील महायुती एकवटली
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एकजूट पाहायला मिळाली. कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर शहरात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
कन्नड येथे पालक पालकमंत्री संजयजी शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांचा पदवीधर मतदारसंघ 76 तालुक्याचा विस्तृत मतदार संघ आहे . मात्र त्यांनी गाव पातळीपर्यंत सतत संपर्क ठेवून कार्यकर्त्यांची उत्तम फळी निर्माण केली आहे. मागील 18 वर्षांपासून ते पदवीधरांचे प्रश्न आक्रमकपणे विधानमंडळात मांडून ते सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. तर अतुलची सावे म्हणाले की, महायुतीची एकजूट आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असल्याने त्यांचा विक्रमी विजय निश्चित आहे. सिल्लोड येथे झालेल्या सभेप्रसंगी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमदार सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागातील पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करून त्यांचे मतदान करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख तथा माजी आमदार संजय केनेकर, नोंदणी सहप्रमुख एम.के.देशमुख यांनी पदवीधर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास देखील पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत डॉ.भागवत कराड, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजुरकर, किशोर शितोळे, अभिजीत देशमुख, माजी आमदार नितीन पाटील, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, संजय खंबायते, स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, सुरेश बनकर, मनोज राठोड, इंद्रिस मुलतानी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?