आमदार सतीश चव्हाण सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व - आमदार सना मलिक
आमदार सतीश चव्हाण सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व- आमदार सना मलिक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन चालणार एक अभ्यासू नेतृत्व आहे असे प्रतिपादन आमदार सना मलिक यांनी व्यक्त केले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आमदार सना मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्दू माध्यमातील शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना सणा मलिक म्हणाल्या की, विधान परिषदेत सर्वाधिक वेळ महिलांना दिला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महिलांचा कायमच सन्मान करत आली आहे त्यामुळे या पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी आपण एकजुटीने राहून त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजाला राजकीय क्षेत्रात आदराचे प्राधान्याने स्थान कुणी दिले असेल तर ते फक्त स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिले. एक मोठी ताकद अजितदादा यांनी आपल्या सर्वांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभी केली. 18 वर्षात जे काही काम केले त्या कामाची स्पर्धा केवळ 18 दिवसात नाही करू शकत असे सांगत त्यांनी उमेदवार सतीश यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
तर आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, मागील तीन टर्म पासून मी या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करत असून माझ्या कार्यालयात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची मी कधीच जात-पात, पक्ष, धर्म पाहत नाही. त्यामुळेच सर्व समाजातील पदवीधर बांधव तिन्ही वेळेस माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यात अनेक प्रश्न सोडवण्यात मला यश आले असे देखील आमदार सतीश चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाजेर काझी, उपाध्यक्ष डॉ.गफार कादरी, प्रा.सुनील मगरे, श्री.अभिजीत देशमुख, डॉ.गणी पटेल, डॉ.बारी सर, असद पटेल, प्राचार्य डॉ.असिफ असिफ झकेरिया, डॉ.कबीर सर, शेख सर, मेहराज पटेल, नबी पटेल, शेख कयूम, शेख मुकरम, जुबेर लाला, डॉ.फिरोज सय्यद आदींसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?