इब्राहिम पटेल यांच्यावर पुन्हा काँग्रेसचा विश्वास, दिली आणखी जवाबदारी
इब्राहिम भय्या पटेल यांच्यावर पुन्हा काँग्रेसचा विश्वास, दिली आणखी जवाबदारी
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) औरंगाबाद नामांतरावराच्या विरोधात किराडपूरा येथील माजी नगरसेवक इब्राहिम भय्या पटेल यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला होता. वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यात यश मिळाले आहे. काँग्रेसने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून शहागंज ब्लॉक अध्यक्षांची जवाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आज शहर कार्यकारिणी काँग्रेसने जाहीर केली आहे. मुस्लिम बहुल वार्डात इब्राहिम पटेल यांचे राजकीय वर्चस्व बघता त्यांना पुन्हा जवाबदारी दिली आहे ते स्वीकारतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. अल्तमश काॅलनी, किराडपूरा, रहेमानिया काॅलनी, बारी काॅलनी, शरीफ काॅलनी वार्डात त्यांचे सामाजिक कार्य अविरत चालू आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची निवडणुकीत मोठी भुमिका असते म्हणून काँग्रेस व विविध पक्षांचे नजरा त्यांच्या भुमिकेकडे असते.
सिडको ब्लॉक अध्यक्षपदी भाऊसाहेब जगताप, छावणी ब्लॉक अध्यक्षपदी उमाकांत विश्वनाथ खोतकर, शहागंज शेख इब्राहिम पटेल, गुलमंडी ब्लॉक अध्यक्षपदी किशोर तुळसीबागवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजीमंत्री राजेंद्र दर्डा, माजीमंत्री अनिल पटेल, प्रदेश सरचिटणीस डॉ . जफर अहेमद, जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख, पंकज फुलफगर, माजी नगरसेवक संजय जगताप, डॉ. सरताज पठाण, डॉ. पवन डोंगरे, माजी नगरसेवक तकी हसन खान, मोहसीन अहेमद, मतीन अहेमद, अनिस पटेल , अली बाबा, ताहेर पटेल, तय्यब पटेल, आरेफ शेख, नईम शेख, शेख आसेफ व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?