इम्तियाज जलील यांच्या प्रचार कार्यालयाचे ओवेसींनी केले उद्घाटन
 
                                इम्तियाज जलील यांच्या प्रचार कार्यालयाचे ओवेसींनी केले उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) एमआयएमचे नेते तथा तेलंगाणाचे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांच्या हस्ते फित कापून औरंगाबाद पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोतीवाला नगर येथे करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अकबरोद्दीन ओवेसी यांनी सांगितले आपल्या पक्षाची व समाजाची आवाज बुलंद करण्यासाठी एकजूट दाखवून एमआयएमच्या उमेदवारांना विजयी करावे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना परत येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जातीय तेढ निर्माण करणा-या पक्षाच्या उमेदवारांना हरवायचे असेल तर नाराजी दुर करावी लागेल. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एमआयएमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा. आज आपल्याकडे हि संधी आलेली आहे त्याचा फायदा करून घ्या. नाही तर देशात काय वातावरण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एमआयएमची ताकत कार्यकर्ते आहेत. पक्षाने जे उमेदवार दिले त्यांचा प्रचार करुन मागिल दहा वर्षांत पक्षाने शहरात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इम्तियाज जलील यांनी सांगितले आमखास मैदानावर झालेल्या अकबरोद्दीन ओवेसी यांच्या सभेमुळे शहराचे वातावरण एमआयएममय झाले आहे. नेहमी येथील जनतेने एमआयएमला आशिर्वाद दिले यावेळी सुध्दा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            