उद्या अतिक्रमण कार्यवाई नाही, सातारा, देवळाई, बीड बायपास परिसरातील कागदपत्रांची तपासणी...
 
                                उद्या सातारा देवळाई, बीड बायपास रोड परिसरातील कागदपत्रांची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
दिनांक 3 जून पासून महानगरपालिकेतर्फे रस्ता रुंदीकरण मोहीमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे.
यादरम्यान दिनांक 12 जुलै शनिवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व आमदार खासदार यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीस शहरातील मुख्य डीपी रस्त्यांवरची अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आता डीपी रस्त्यांचे लगत सामासिक अंतरामध्ये जे मालमत्ता आहेत त्यांचे कागदपत्रे महापालिकेचे पथक तपासणार आहे. या कागदपत्रांमध्ये बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण दाखला आणि मालमत्ता कर भरणा या बाबींचा प्रामुख्याने समावेश राहील.
ज्या मिळकत धारक आपली मालमत्तेबाबत वरीलपैकी कोणतेही कागदपत्र दाखल करण्यास असक्षम आहे अशी मालमत्तांवर कारवाई करण्यात येणार आहे. मा.उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीत येण्यापूर्वी ग्रामपंचायत चे बांधकाम परवाना प्रमाणपत्र गृहीत धरले जाणार नाही कृपया याची नोंद नागरिकांनी घ्यावी. ज्या भागात कारवाई आहे त्या भागात कारवाईच्या एक दिवस आधी महानगरपालिकेचे पथक येऊन सामासिक अंतरामध्ये मालमत्तांची कागदपत्रे तपासणार आहे. यावेळी जे कोणी मालमत्ता धारक ताबडतोब गुंठेवारी करण्यास इच्छुक आहे त्यांना गुंठेवारी कायदा अंतर्गत त्यांची मालमत्ता नियमित करून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उद्या दिनांक 14 जुलै रोजी ही पथके बीड बायपास रोड, सातारा-देवळाई परिसर येथे कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. तरी या भागातील नागरिकांनी पथकाशी सहकार्य करावे, असे आवाहन जी श्रीकांत यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            