एनएसयुआयने सुरू केली "महाराष्ट्राचा लाडका बेरोजगार" स्वाक्षरी मोहीम

 0
एनएसयुआयने सुरू केली "महाराष्ट्राचा लाडका बेरोजगार" स्वाक्षरी मोहीम

एनएसयुआयने सुरू केली "महाराष्ट्राचा लाडका बेरोजगार" स्वाक्षरी अभियान 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज)

महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस(NSUI) च्या वतीने "महाराष्ट्राचा लाडका बेरोजगार" स्वाक्षरी अभियान सुरू केली आहे. 

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात शहरातून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन एनएसयुआयचे प्रदेश महासचिव डॉ.शादाब अब्दुल रहेमान शेख यांनी केले होते. 

त्यांनी डि-24 न्यूजला सांगितले या अभियानाचे उद्दिष्ट बेरोजगार तरुणांच्या समस्या उघड करणे. त्यांना योग्य रोजगार सरकारने प्रदान करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.

सरकारने लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना सुरू केली त्याऐवजी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. 500 लोकांनी या अभियानात सहभाग घेतला.

या कार्यक्रमात जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेश जेथलिया, एनएसयुआयचे महाराष्ट्र अध्यक्ष आमिर शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, राहुल संत, राजेश मुंडे, खालेद पठाण,सागर मुगदीया, नाजिम खान यांची उपस्थिती

होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow