ऐतिहासिक कमल तलावात फुलले कमळ, हिशाम उस्मानी यांच्या मागणीला यश...

 0
ऐतिहासिक कमल तलावात फुलले कमळ, हिशाम उस्मानी यांच्या मागणीला यश...

ऐतिहासिक कमल तलावाचे सौंदर्य फुलले, मो. हिशाम उस्मानी यांच्या मागणीला यश...

एतिहासिक कमल तलावात वाॅकींग प्लाझा, या तलावात फुलले कमळ, लवकरच होईल उद्घाटन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)

ऐतिहासिक जामा मस्जिद समोर असलेले ऐतिहासिक कमल तलाव हे मोगलकालिन आहे हि शहराची ओळख आहे. ऐतिहासिक धरोहरचे विकास व्हावे, शहरात पर्यटकांची संख्या वाढून आर्थिक पाठबळ व पर्यटन उद्योग वाढावे अशी विकासाची दुरदृष्टी ठेवणारे समाजसेवक मोहंमद हशाम उस्मानी यांनी 2020 साली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असताना तात्कालिन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कडे कमल तलावाच्या सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती व त्यानंतर विशेष बैठका घेऊन तात्कालिन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे व तत्कालीन जिल्हा पुरातत्त्व विभागाचे प्रमुख मिलिंद चौगुले यांच्या कडे पाठपुरवठा करून सविस्तर प्रस्ताव मांडला व चर्चा केली होती. कमल तालावाची दुर्दशा झाली होती, तसेच काही लोकांनी या परिसरात अतिक्रमणे केली होती वा हा पर्यटनस्थळ विद्रूप झाला होता. या मागणीला यश मिळाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत मोठी निधी खर्च करत येथे संरक्षण भींत, कमल फुलांची उत्पत्ती, तलाव परिसरात वाॅकींग प्लाझा, पक्षाच्या वास्तव्यासाठी दाट झाडे तलावात लावली आहे. येथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. लवकरच या कमल तलावाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटकांची संख्या वाढणार आहे म्हणून मनपा प्रशासनाचे समाजसेवक मोहंमद हिशाम उस्मानी यांनी माध्यमांना माहिती देत आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow