ऑल इंडिया उलमा बोर्डच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती कार्यक्रम उत्साहात...
ऑल इंडिया उलमा बोर्डच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्रांचे वितरण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10 (डी-24 न्यूज) – ऑल इंडिया उलमा बोर्डच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला बोर्डाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अल्लामा बुनई हसनी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष साबित अली नक्शबंदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नागपूरचे सोहेल पटेल अशरफी यांची वक्फ विंगच्या राष्ट्रीय इन्चार्जपदी, तर ॲड. फातेमा पठाण यांची राष्ट्रीय महिला विंगच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मुतवल्ली तथा वक्फ विंगचे मोहम्मद लुकमान कादरी यांची राष्ट्रीय महासचिवपदी, महेवीश कादरी यांची राष्ट्रीय सहसचिवपदी, तर रफीक बंदानवाजी आणि सय्यद शाबोद्दीन यांची प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीपत्र वितरण समारंभानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र वक्फ विंगचे अध्यक्ष आसिफ शेख आणि उपाध्यक्ष अश्रफ पठाण यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?