औरंगपूराचे नाव आता संभाजी पेठ, एमआयएमचा सर्वसाधारण सभेत विरोध, दहा स्विकृत नगरसेवक विराजमान...!
औरंगपूराचे नाव आता संभाजी पेठ, एमआयएमचा सर्वसाधारण सभेत कडाडून विरोध...शिक्षण, आरोग्य व नागरीकांना पायाभूत सुविधा द्या नावे बदलून काय फायदा...
महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड...
सर्वसाधारण सभेत महापौरांनी दिली मान्यता...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत औरंगपुराचे नाव संभाजीपेठ व काही रस्त्यांच्या नाव ठेवण्याच्या विषयावर गाजली.
नाव बदलण्याचे भावनिक राजकारण सोडून शहरातील नागरिकांना दर्जेदार शाळा, आरोग्य सुविधा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असा प्रहार गुलमंडी प्रभागाच्या एमआयएमच्या नगरसेविका तरन्नूम अकील सागर यांनी सर्वसाधारण सभेत केला.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनीही नाव बदलण्याच्या विषयावर अक्रामक झाले. प्रभाग क्रमांक 1 हर्सुलचे नगरसेवक अजहर पठाण यांनी हर्सुल तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना वाढत आहेत. यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली. प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक मोहम्मद वाजेद जगिरदार यांनी रहेमानिया काॅलनी येथील नाल्यांची सफाई व कटकट गेट येथील ख्वाजा गरीब नवाज रुग्णालयात मॅटरनीटी होम सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर यांनी 10 स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यात भाजपचे 5, एमआयएमचे 3, शिंदेसेना आणि शिवसेना उबाठा यांचा प्रत्येकी 1 नगरसेवकाचा समावेश आहे. या 10 स्विकृत नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना नगरसेवक म्हणून कामकाज करण्याची सभागृहात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महानगरपालिकेत 115 नगरसेवक आहेत. यात सत्ताधारी भाजपाचे सर्वाधिक 57 नगरसेवक, एमआयएम 33, शिंदेसेना 13, शिवसेना उबाठा 6, वंचित 4, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 1, काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे. नगरसेवकांच्या तौलनिक संख्येनुसार महापालिकेने दहा स्विकृत सदस्यांसाठी अर्ज मागविले होते. 80 इच्छूकांचे अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जाची छाननी केली असता 52 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. वैध अर्ज ठरलेल्यांमधून त्या त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून नाव मागविण्यात आली होती. गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात स्विकृत सदस्यासाठी नावे दिली. सोमवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर यांनी दहा स्विकृत सदस्यांची नावे जाहीर केली. महापालिकेच्या बाहेर स्विकृत सदस्यपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
दहा नगरसेवकांची मागणी...
भाजपाकडून माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार डॉ.भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड यांच्यासह छाया खाजेकर, गोकुलसिंग मलके, विजयसिंग झाला, अमृता पालोदकर यांना संधी देण्यात आली आहे. एमआयएमचे डॉ. कुणाल खरात, शेख अहेमद शेख इलियास, मोहम्मद असरार मोहम्मद अकबर यांना, शिंदेगटाने शुभम काळे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रदीप उर्फ हनुमान दिनकरराव शिंदे यांना संधी दि
ली आहे.
What's Your Reaction?