कच-याच्या गाड्या फोडण्याची इम्तियाज जलिल यांची धमकी, कचरा संकलन केंद्र हटवले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा...!
कच-याच्या गाड्या फोडण्याची इम्तियाज जलिल यांनी दिली धमकी...! आंदोलन तीव्र करणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - एन-12 सिडको परिसरातील कचरा संकलन व वर्गीकरण केंद्र हटवले नाही तर कच-याच्या गाड्या फोडण्याची धमकी आज सायंकाळी आंदोलनादरम्यान मनपा प्रशासनाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. महापालिकेचे अधिकारी भोंभे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी हि धमकी दिली आहे. महापालिकेच्या सत्ताधारी हे कचरा उचलणा-या कंपनीचा फायदा करण्यासाठी येथील रहिवासीच्या आरोग्याशी खेळत आहे. डिपी प्लॅन मध्ये हि मोकळी जागा कचरा प्रक्रिया करण्यासाठी आरक्षित आहे का...? असेल तर दाखवावे. कच-याचा टेंडर कंपनीला दिला मग कच-यावर प्रक्रिया व वर्गीकरण कोठे करायचे ती जवाबदारी कंपनीची आहे. शहराबाहेर कचरा डंप करा शहरातील कोणत्याही रहीवासी परिसरात हे काम करु देणार नाही. तात्काळ हे काम थांबवावे नसता कार्यकर्ते कच-याच्या भरलेल्या गाड्या येथे आले आणि फुटल्या तर मी जवाबदार राहणार नाही. पोलिस स्वरक्षण घ्यावे लागेल. येथे तीन मंदीर, सलिम अली सरोवर, कॅन्सर हॉस्पिटल, रहीवासी घरे आहेत. कच-यामुळे जनतेला होणारा त्रास सत्ताधारी बघत आहे. आपल्याला हिंदूंचे ठेकेदार म्हणणारे आता कुठे गेले. कचरा मंदीराच्या जवळ टाकला जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. सेंट्रल नाका असो किंवा हर्सुल कचरा संकलन केंद्र शहराबाहेर हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलन स्थळी सिटी चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांनीही इम्तियाज जलिल व पदाधिकारी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शांततेत आंदोलन झाले. रेटारेटी करत कार्यकर्ते कचरा संकलन केंद्रात घुसले त्यांनी महापालिकेचे अधिकारी यांना येथील बिकट परिस्थिती दाखवली. याप्रसंगी विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान व नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
.
What's Your Reaction?