कार्यकर्त्यांचा मान, पदवीधरांचा सन्मान व शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी निवडणुकीच्या मैदानात - एम.के.देशमुख

 0
कार्यकर्त्यांचा मान, पदवीधरांचा सन्मान व शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी निवडणुकीच्या मैदानात - एम.के.देशमुख

कार्यकर्त्यांचा मान, पदवीधरांचा सन्मान आणि शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी निवडणुकीच्या मैदानात : एम.के. देशमुख

शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्याचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 6 (डि-24 न्यूज) – औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केला. यावेळी मराठवाड्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना एम.के. देशमुख म्हणाले की, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या मागील आठ निवडणुकांपैकी चार वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपचा अधिकृत उमेदवार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला असला तरी अमरावती आणि पुणे येथे महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.

टीईटीच्या प्रश्नावरही सरकारला घेरले

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधताना देशमुख यांनी टीईटी परीक्षेतील घोळ, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह अनेक मुद्दे उपस्थित केले. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“कार्यकर्त्यांचा मान, पदवीधरांचा सन्मान आणि शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी ही निवडणूक लढविण्याचा माझा निर्धार आहे. शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि शिक्षक-पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे,” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

भाजपला ही जागा मिळावी, या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली होती. आम्ही भाजपला जागा सुटेल या अपेक्षेने सुमारे दीड लाख मतदारांची नोंदणी केली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता

या निवडणुकीत परिवर्तन घडेल आणि प्रस्थापितांना धक्का बसेल, अशी अपेक्षा पदवीधर मतदारांकडून व्यक्त होत असल्याचे देशमुख म्हणाले. आपल्याला या निवडणुकीत मतदारांचा आशीर्वाद मिळेल आणि यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एम.के. देशमुख यांनी दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रा. मनोज पाटील, भाऊसाहेब तुपे, रमेश तांगडे, प्रा. वाल्मिक सुरासे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow