कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात 67 अर्ज प्राप्त
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात आज 67 अर्ज प्राप्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 12 (डि-24 न्यूज)- जिल्ह्यात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आज आयोजीत 11 विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण 67 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली आहे. आज जिल्ह्यात कांचनवाडी, शेकटा ता. छत्रपती संभाजीनगर, पैठण, पिंपळवाडी ता. पैठण, वेरुळ ता. खुलताबाद, हतनूर, चिकलठाण ता. कन्नड, हर्सूल, डोणगाव ता. गंगापूर, खंडाळा, बोरसर ता, वैजापूर अशा 11 ठिकाणीही शिबिरे झाली.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिबिरात 11, वैजापूर तालुक्यात 10, गंगापूर तालुक्यात 3, कन्नड तालुक्यात 19, खुलताबाद तालुक्यात 24 असे एकूण 67 अर्ज प्राप्त झाले.
या प्रस्तावांची ऑनलाइन प्रक्रिया बाकी असून, तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार आ
हे.
What's Your Reaction?