क्रीडा कौशल्यासोबत भविष्यातील करीअरची तयारी करा - क्रीडा उपसंचालक शेखर पाटील
क्रीडा कौशल्यासोबतच भविष्यातील करिअरची तयारी करा
– क्रीडा उपसंचालक शेखर पाटील
लोकसंवाद कार्यक्रमात खेळाडूंना मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- :- खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात प्रगती साधतानाच शिक्षण, कौशल्यविकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचाही गांभीर्याने विचार करावा. क्रीडा कारकीर्दीसोबतच पर्यायी करिअरची तयारी केल्यास भविष्यात विविध क्षेत्रांतील संधींचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुलातील निवासी क्रीडा प्रबोधिनी येथे गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य श्रीमती पूनम नवगिरे, सहाय्यक संचालक सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
क्रीडा उपसंचालक पाटील म्हणाले, खेळाडूंनी उपलब्ध प्रशिक्षण व सुविधांचा प्रभावी उपयोग करून आपल्या क्रीडा कौशल्याचा सातत्याने विकास करावा. स्पर्धांमधून मिळणारा अनुभव, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणांचा उपयोग भविष्यातील विविध क्षेत्रांतही करता येतो. क्रीडा क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, शरीरविज्ञान व पुनर्वसन यांसारख्या क्षेत्रांतही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच खेळाडू आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत उपलब्ध संधींची माहिती घेऊन त्यासाठी आवश्यक पात्रता व तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत पत्रकारितेतील विविध संधी या विषयावरच्या माहितीचा संदर्भ आपल्या करिअरमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवावा. तसेच क्रीडा आणि माध्यम क्षेत्रातील शिक्षण आपले व्यक्तिमत्व आणि कौशल्य वाढवू शकते असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडा पत्रकारितेतही करिअरच्या संधी...
माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी यावेळी माध्यम क्षेत्रातील संधी याविषयी माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात प्राथमिक करिअर करताना पत्रकारिता व जनमाध्यमातील वेगवेगळ्या संधीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.‘क्रीडा पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन केले. क्रीडा क्षेत्रासोबत पत्रकारिता, क्रीडा पत्रकारिता, समालोचन, जनसंपर्क, संहिता लेखन, जाहिरात, डिजिटल माध्यम मोबाईल जर्नालिझम अशा कितीतरी क्षेत्रात एक अतिरिक्त कौशल्य म्हणून प्राविण्य मिळवले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. दुसाने म्हणाले, खेळाडूंनी क्रीडेसोबत शिक्षणालाही समान महत्त्व द्यावे. क्रीडा कारकीर्दीला विशिष्ट वयोमर्यादा असल्याने पुढील शैक्षणिक टप्प्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक आहे. अकरावी-बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक, कृषी, कला यांसह पत्रकारितेतील विविध संधीची, अभ्यासक्रमांची माहिती घेऊन आपल्या आवडी आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा निश्चित करावी.
छत्रपती संभाजी नगर क्रीडा उपसंचालक कार्यालय, माहिती उपसंचालक व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत या महासंवाद कार्यक्रमाचे आयो
जन करण्यात आले होते.
What's Your Reaction?