गरजू महीलांना रोजगारासाठी गुलाबी ई-रिक्षा, इच्छूकांचे मागवले अर्ज
गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई-रिक्षा; इच्छुकांकडून अर्ज मागविले
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13 (डि-24 न्यूज)
गरजू महिलांना रोजगार मिळविण्यासाठी महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी गरजू महिलांना गुलाबी (पिंक) ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व गरजू महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिवाजी वने यांनी कळविले आहे.
गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करुन देण्याबाबत दि.8 जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
पात्रताः लाभार्थी महिलेचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. वय 18 ते 35 दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. वाहन चालक परवाना असणे आवश्यक. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशिता यांना प्राधान्य देण्यात येईल. दारिद्र्य रेषेखालील महिलांनाही प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती लॉटरी पद्धतीचा अवलंब करुन करेल. ई –रिक्षा किमतीच्या 10 टक्के पात्र लाभार्थी, 20 टक्के राज्यशासन, आणि 70 टक्के बॅंक कर्ज या प्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कर्जाची परतफेड 5 वर्षात करावी लागेल. या योजनेअंतर्गत एकदाच लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रेः ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बॅंक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, चालक परवाना, रिक्षा ही महिलाचा चालवेल याबाबतचे हमी पत्र, अटीशर्ती पालनाचे हमीपत्र
गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिवाजी वने यांनी केले आहे.
What's Your Reaction?