गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चौघांना अटक, 1 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त
गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने पकडले; 1 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज )- शहरात गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे असा सुमारे 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत जटवाडा रोड परिसरात काही जण पिस्तुले विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत शेख शकील शेख नाजिम (वय 19, राहणार सईदा काॅलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर), सय्यद अल्फाज सय्यद अहमद (वय 21, राहणार आलमगिर काॅलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर), शेख अबू नासेर शेख शरीफ (वय 27, राहणार आनंद मेडीकल ची गल्ली, सईदा काॅलनी) आणि उमर दुर्राणी जिया दुर्राणी (वय 25, पिली काॅलनी, चंपा चौक) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने केली. या पथकात पोउपनि अर्जुन कदम, पोह राजेंद्र साळुंखे, योगेश गुप्ता, श्रीकांत कोल्हे, पोअं मनोहर गिते, मनोहर त्रिभुवन, विक्रम खंडागळे, चापोह शिनगारे यांनी हि कामगिरी केली आहे.
What's Your Reaction?