घाटीत विनयभंग प्रकरणी केले जोरदार आंदोलन
क्ष-किरण विभागातील विनयभंग प्रकरणी विभाग प्रमुखास निलंबित करा...
डमी कामगार प्रकरणी प्रशासनास धारेवर धरत केले जोरदार आंदोलन...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज)
शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दि.25 ऑगस्ट रोजी क्ष-किरण विभागात घडलेल्या विनयभंग प्रकरणी विभाग प्रमुख वर्षा रोटे यांना विभागप्रमुख पदावरून हटविण्यात यावे या मागण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे यांनी संयुक्तपणे जोरदार घोषणाबाजी करत मुख्य प्रशासकीय इमारत येथे आंदोलन केले.
विनयभंग करणारा कर्मचारी हा सध्या रुग्णालयात कार्यरत नाही तरी देखील तो रुग्णालयाचे ओळखपत्र वापरतो, थेट क्ष-विभागात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतो यावरून त्याला काही वरिष्ठांचा अर्थात विभाग प्रमुखांचा वरदहस्त आहे काय ? सुमारे 70 टक्के विभागात कायम कर्मचाऱ्यांनी डमी कर्मचारी नेमले आहेत त्याला विभागप्रमुख पाठीशी का घालतात ? यात कुणाचे आर्थिक हित गुंतलेले आहे असे प्रश्न निवेदनात उपस्थित केले आहेत. लक्षवेधी फलक
आंदोलकांनी झळकावत 'रुग्णसेवेची नाही हमी- 70% विभागात नेमलेत डमी' 'महिला रुग्ण सुरक्षित न्हाय- रुग्णालय प्रशासन करतंय काय' असे फलक आंदोलनाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी शाहीर चरण जाधव यांनी क्रांतिगीते सादर केले.
मोठ्या आशेने लोक 'घाटी गरिबांसाठी' असे उद्गार काढतात परंतु सदरच्या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व रुग्णसेवेवर प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी बेजबाबदार पणे वागणाऱ्या विभागप्रमुख डॉ.वर्षा रोटे याना तात्काळ निलंबित करावे, विविध विभागात कार्यरत डमी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन संबंधित कर्मचारी, विभागप्रमुख, टेक्निशियन यांच्यावर 8 दिवसांच्या आत कारवाई करा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला .
प्रभारी अधिष्ठाता डॉ.प्रसाद देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक सु. र.हरबडे यांनी निवेदन स्वीकारले.
आंदोलनात सचिन निकम, चंद्रकांत रूपेकर, प्रा. सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, गुणरत्न सोनवणे, अमित घनघाव,अतुल कांबळे, धम्मापाल भुजबळ,विनोद वाकोडे, प्रशांत बोराडे, अस्कर खान, शकील शेख, शैलेंद्र म्हस्के, अक्रम खान, कुणाल भालेराव, सम्यक सरपे, विश्वजित गायकवाड, सल्लू सय्यद सालिक, असजद खान, शेख मोहम्मद, शैलेश बागुल, मानव साळवे, नागेश केदारे, नितीन साळवे, सौरभ खंडारे, सिद्धार्थ दिवेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?