चंद्रकांत खैरे यांना लाखोंच्या मतांनी विजयी करा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

 0
चंद्रकांत खैरे यांना लाखोंच्या मतांनी विजयी करा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

इंडिया आघाडीचे उमदेवार चंद्रकांत खैरे यांना लाखो मतांनी विजयी करा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) गांधी भवन शहागंज येथे इंडिया आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हजरी लावून मार्गदर्शन केले. आपल्या भाषणामध्ये भाजपावर सडकुन टिका केली. त्यांनी भाजपावर महागाई वाढवली, बेरोजगारी वाढविली असे विविध मुददे मांडले. तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना लाखो मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 

 यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे भाषण झाले. त्यांच्या सोबत औरंगबाद शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खाजा शरफोददीन, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आ.नामदेवराव पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष इब्राहीम पठाण, दिपाली मिसाळ, प्रकाश मुगदिया, इकबालसिंग गिल, अ‍ॅड.सयद अक्रम, अनिस पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर, मोईन इनामदार, महेंद्र रमंडवाल, उमाकांत खोतकर, अहेमद चाऊस, जयप्रकाश नारववरे, डॉ.पवन डोंंगरे, संतोष भिंगारे, श्रीराम इंगळे, बाबुराव कवसकर, विजय कांबळे, आसमत खान, मंजु लोखंडे, रेखा राऊत, अनिता भंडारी, वैशाली तायडे, शेख रईस, मसरुर खान, रवि लोखंडे, सुभाष देवकर, सलीम खान, कैसर बाबा, शिरीष चव्हाण, जाफर खान, डॉ.सरताज पठाण, प्रा.रमाकांत गायकवाड, साहेबराव बनकर, संजय धर्मरक्षक, शाहुराज कांबळे, प्रमोद सदाशिवे, हकीम पटेल, जमील खान, सबीया शेख, संतोष दिडवाले, शफीक शहा, नदीम सौदागर, नगमा सिध्दीकी, युनुस खान, आकाश रगडे, विदया घोरपडे, नंदा घोरपडे, श्रीकृष्ण काकडे, सयद युनुस, प्रविण केदार, शकुंतला साबळे, रेखा मुळे, सयद जुबेर, सलमान पटेल, मोईन कुरैशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

माजी मंत्री दिवंगत गंगाधर गाडे यांचे निधनामुळे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अरुण शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिस पटेल यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow