चटनी भाकरी खावून वंचितची "काळी दिवाळी" साजरी
वंचितच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर"काळी दिवाळी" साजरी
"देवेंद्र-नरेंद्र तुपाशी शेतकरी उपाशी"च्या घोषणा देत चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत राज्य सरकारचा निषेध...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'काळी दिवाळी' साजरी करण्यात आली.
यावेळी शेतकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच "देवेंद्र-नरेंद्र तुपाशी शेतकरी उपाशी" अशा घोषणा देत सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी आणि शेतकरी व शेतमजुरांना ठोस मदत जाहीर करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी बांधावर काळ्या पट्ट्या बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध केला तर प्रमुख नेत्यांनी भाषणे केली.
यावेळी नगरसेवक अमितभाऊ भुइगळ, सभापती नगरसेविका करुणा जाधव, प्रवक्ते तय्यब जफर, महेश निनाळे, योगेश बन रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, सतीश गायकवाड, मिलिंद बोर्डे, पंकज बनसोडे, शांताराम हिवराळे, बाबासाहेब दुशिंग, संदीप जाधव, सचिन शिंदे, वंदना नरवडे पल्लवी बनसोडे, अंजन साळवे, प्रवीण हिवाळे, शाहीर मेघानंद जाधव, सोमनाथ निकाळजे', बनेखा पठाण, सखाराम शिनगारे, भावी गवई, प्रवीण जाधव ,अशोक खिल्लारे, रविरत्न पारखे, राजन कीर्तने, सतीश शिंदे, उमेश सरदार इकबाल एम एच, मुंजा तुपसमुद्रे , भीमराज बोर्डे, सुभाष वानखेडे, राहुल जाधव, सचिन शिंदे महेंद्र चाबुकस्वार, बबलूभाई बागवान', अरुण घोडके, अक्षय देहाडे, संदीप पगारे, कारभारी पवार, शिवाजी सोनवने, जया गजभिये, नागेश जाधव, शेषराव निकाळजे पंकज गायकवाड, खुशालराव बनसोडे, प्रकाश दाभाडे, आनंद शेजुळ, भगवान खिल्लारे, राहुल वेलदोडे, दामोदर दाभाडे, भास्करराव खंडागळे, कैलास काळे, एम एन धंदर, वानखडे सर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थि
त होते.
What's Your Reaction?