चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका कंपनीजवळ आग, अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण

 0
चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका कंपनीजवळ आग, अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण

चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका कंपनीत आग, अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29 (डि-24 न्यूज) :- चिकलठाणा औद्योगिक परिसरातील हार्मोन कंपनीजवळ रविवारी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या भूमिगत पाइपलाइनला अचानक आग लागली. पाइपलाइनमधून आगीच्या उंचच उंच ज्वाला बाहेर पडत असल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनचा कॉक बंद करण्यात आला. मात्र, पाइपलाइनमध्ये शिल्लक असलेल्या गॅसमुळे आगीच्या ज्वाला सुरूच होत्या. त्यामुळे अग्निशमन जवानांनी पाण्याचा सतत मारा सुरू ठेवला.

सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून मुख्य गॅस पुरवठा बंद केल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास मदत झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow