जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी सद्भावना मंच घेणार पुढाकार...

जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी सद्भावना मंच घेणार पुढाकार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - शहरातील मौलाना आझाद कॉलेज येथे सद्भावना मंचची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुढील तीन महिने सद्भावना मंच जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे. यावेळी मंचच्या दिल्लीगेट शाखेच्या अध्यक्षा अशरफ उन्निसा यांनी सद्भावना मंचची भूमिका यावर भाष्य केले. भारतीय महिला फेडरेशनच्या वसुधा कल्याणकर यांनी महिलांच्या सद्य परिस्थितीत वाढते अत्याचार तसेच द्वेषपूर्ण वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले. तसेच महिला चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे (MSMP)ची भूमिका व वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जमात-ए-इस्लामीच्या शाईस्ता कादरी यांनी सद्भावना मंचचे महत्व व सर्व जाती धर्माच्या महिलांमध्ये एकजूट तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सद्भावना मंचच्या अध्यक्षा कांचन सदाशिवे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले की स्त्रिया खूप शिकल्या, करिअर करत असल्या तरीही त्यांच्यावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही दलित अल्पसंख्यांक महिलांना न्याय मिळत नाही त्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी स्त्रियांनी एकत्र यावे. यावेळी मंचच्या संगीता खंडाळकर, ललिता घोरपडे, नुसरत बाजी, मेहरूक फातिमा, वहिदा वहाब, सलमा शबिबी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
What's Your Reaction?






