जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला वनविभागातून परवानगी द्या - इद्रीस मुलतानी

 0
जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला वनविभागातून परवानगी द्या - इद्रीस मुलतानी

जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला वनविभागातून परवानगी द्या-इद्रीस मुलतानी

मुंबई, दि.6(डि-24 न्यूज)- सिल्लोड–सोयगाव तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जाळीच्या देव ते सावळदबारा या महत्त्वाच्या रस्त्याच्या वन विभागाच्या परवानगीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी संबंधित मागणीचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.

हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने आवश्यक परवानगीअभावी अनेक वर्षांपासून रखडला होता. परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले.

मागणीची गांभीर्याने दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रादेशिक वन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच मुख्य वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांना प्रस्तावाला गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

पोखरा योजनेतील रखडलेले अनुदान तात्काळ वितरण करण्याची मागणी 

त्यानंतर महाराष्ट्र राज्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) यांच्या प्रकल्प संचालक मिनल करणवाल यांचीही भेट घेण्यात आली. सिल्लोड–सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोखरा योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या ठिबक सिंचन, पाईपलाइन, मोटार, शेडनेट, शेततळे, विहीर पुनर्भरण तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रलंबित अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या संदर्भात सिल्लोड–सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची दखल घेत मिनल करणवाल यांनी प्रकरणाची सकारात्मक दखल घेऊन प्रलंबित अनुदानाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव सुनील गावंडे, ईश्वर क्षीरसागर, संभाजी पवार, आकाश पाटील, विवेक शेळके, सुनील चव्हाण तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या विकासाशी आणि शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने सिल्लोड–सोयगाव तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow