जिल्हा न्यायालय बाॅम्बने उडवण्याची धमकीने खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क, ई-मेल पाठवणा-याचा शोध सुरू
जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेल मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 3 (डि-24 न्यूज) : जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणाला लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सुरक्षा यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आले आहे.
धमकीच्या ई-मेलची माहिती समोर येताच पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. न्यायालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेची तपासणी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या धमकी नंतर न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. सर्व न्यायालयाबाहेर आले होते.
धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू
धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे. ई-मेलचा स्रोत, आयपी ॲड्रेस आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर तपासाद्वारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही धमकी केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे काही गंभीर कट आहे, याचाही तपास सुरू आहे.
न्यायालयाच्या सुरक्षेवर विशेष लक्ष
जिल्हा न्यायालयात दररोज मोठ्या संख्येने पक्षकार, वकील, न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी येत असतात. त्यामुळे बॉम्बस्फोटाची धमकी गांभीर्याने घेत न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सरकारी आणि न्यायिक संस्थांना ई-मेलद्वारे मिळणाऱ्या धमक्या तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आ
ला आहे.
What's Your Reaction?