डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बचत गटाच्या गरजू महीलांना शिलाई मशीनचे वाटप...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बचत गटाच्या गरजू महीलांना शिलाई मशीनचे वाटप...
स्वयंनिर्माण फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त स्तुत्य उपक्रम...
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी), दि.12-
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांनी संविधानाच्या माध्यमातून महीलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व शिक्षण, नौकरी, स्वसंरक्षणासाठी कायदे बनवली त्यामुळेच आज देशातील महीला सन्मानाने जीवन जगत आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी व महीलांनी स्वावलंबी बनावे व आत्मनिर्भर व्हावे या हेतूने मागिल तीन वर्षांपासून शहरात स्वनिर्माण फाऊंडेशन काम करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बचत गटाच्या गरजू महीलांना आज दुपारी एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 25 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रीती संदीप शेगोकार यांची उपस्थिती होती.
अगोदर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्रीती शेगोकार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले देशातील सर्व महीला स्वावलंबी बनावे. चूल आणि मूल यासोबतच आणखीन जवाबदारी महीला सांभाळू शकतात हे महीलांनी आपला कर्तव्याचा ठसा उमटवून दाखवून दिले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या कायद्यांमुळे हे संभव झाले. मी सर्वसामान्य कुटुंबातून असताना तीन वर्षांपूर्वी फाऊंडेशनची स्थापना केली. सोबत काम करणाऱ्या सहकार्यांची साथ लाभली. आज 700 महीला बचतगट फाऊंडेशनशी जोडले गेले. एसबीआय बँकेच्या सहकार्याने हजारो महीलांना रोजगार गृह उद्योगांसाठी उपलब्ध करून दिल्याचे समाधान आहे. राज्य व केंद्र शासनाच्या योजना बचत गटापर्यंत पोहचवून त्यांना प्रशिक्षण देणे. विविध कोर्सेस त्यांच्यासाठी चालवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम निस्वार्थ भावनेने सुरू आहे. नवीन बचत गट फाऊंडेशनला जोडण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी करत पुढील काळात सर्वांचे सहकार्य लाभले तर हे कार्य सुरू राहणार आहे. असे शेवटी त्यांनी सांगितले.
सुत्रसंचलन फाऊंडेशनचे व्यवस्थापक रिझवान शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सविता राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिए विनायक कापकर, अभिजित हिवराळे, प्रवीण जाधव, श्रीमती सविता राऊत, श्रीमती रुपाली तायडे, श्रीमती माधुरी दांडगे, श्रीमती पल्लवी मोटे, श्रीमती ज्योती साबळे व मोठ्या संख्येने महीला बचत गटाच्या महीला उपस्थित होते.
What's Your Reaction?