तुकाराम मुंढें यांचा हाॅटेलचालकांना कडक इशारा, काय आहे इशारा बातमीत वाचा...!
आता हॉटेल चालकांना तुकाराम मुंढेंचा कडक इशारा, काय इशारा दिला बातमीत वाचा...
किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळे ठेवावे, किचन कसे असावे...? पिण्याचे शुध्द पाणी द्यावे लागेल, तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
मुंबई, दि.24(डि-24 न्यूज)- अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही मोहीम सुरू हाती घेण्यात आली आहे. त्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांना सोडणार नाही, असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार या हॉटेल्सचे किचन असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आरोग्य विषयी नियमांचे पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक असावे. जर नियमांचे पालन केले तर घाबरण्याचे कारण नाही. नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावे, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
किचन कसे असावे...?
भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात.
त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात.
त्यातून पाणी झिरपू नये.
हे करताना पुरेशी हवा खेळती हवी.
किचनला एक्झॉस्ट असावा.
कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावा.
स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन
कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावेत.
इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.
पेस्ट कंट्रोल नियमित करावे.
अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा.
ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.
पिण्याचे शुध्द पाणी मोफत द्या
अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवले जाते. तसे न करता ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. तसा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. जर एखाद्या ग्राहकाला बाटलीबंद पाणी हवे असेल, त्याने मागणी केली तरच त्याला ते देण्यात यावे असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?