तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमने जाहीर केली उमेदवारांची यादी
 
                                तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमने जाहीर केली उमेदवारांची यादी
औरंगाबाद,दि.3(डि-24 न्यूज) तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये सहा उमेदवारांची नावे आहेत. या राज्यात सात जागेवर नेहमी एमआयएम(मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन) निवडणूक लढते पण यावेळी किती उमेदवार रिंगणात उतरणार अजून निश्चित नाही पण सहा उमेदवार मैदानात उतरले आता निश्चित झाले आहे. भारत राष्ट्र समितीसोबत निवडणूक लढणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला होता की केसिआर यांची पुन्हा तेलंगणात सत्ता येईल.
चंद्रायनगुट्टा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा अकबरुद्दीन ओवेसी, चारमिनार येथून मिर झुल्फिकार अली, कारवान येथून कौसर मोहीयोद्दीन, मलकपेट येथून अहेमद बिन अब्दुल्लाह बलाला, नामपल्ली येथून मोहंमद मजिद हुसेन, याकूतपुरा मतदार संघातून जफर हुसेन मेराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचे सुप्रीमो बॅ.खा.असदोद्दीन ओवेसी यांनी घेतला असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            