दुकानांच्या पाट्या, साईनबोर्ड मराठीत लावा नाही तर दुकाने सिल करणार मनपा
प्रोझोन मॉल येथे पाट्या, साइनबोर्ड मराठीत लिहा, मनपा प्रशासक...
15 दिवसात जर मराठी भाषेत पाट्या नाही लावल्या तर दुकान सील करणार...
औरंगाबाद,दि.7(डि-24 न्यूज) प्रोझोन मॉलसह शहरातील सर्व दुकाने व प्रतिष्ठान यांनी दुकानाचे नावफलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेत पण लावावे, असे आदेश आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.
मनपा प्रशासकांनी आज प्रोझोन मॉलला भेट दिली आणि मॉल मधील सर्व शोरूम मालकांना त्यांच्या दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाचा आदेशानुसार मराठी भाषेत लिहण्याचे निर्देश दिले. याशिवाय ज्या शोरूम्सचे नाव मराठी भाषेत बारीक अक्षरात लिहले आहे त्यांनी मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली.
ही मुदत संपल्यावर पण प्रोझोन मॉल आणि शहरातील इतर सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानांचे साइनबोर्ड मराठी भाषेत नाही लावले तर अशा दुकान आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?