न.पा.निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा...
न.पा. निवडणूकःजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूकीसाठी उद्या मंगळवार दि.२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या मतदान पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला.जिल्हा मुख्यालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे हा आढावा घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सहा. आयुक्त नगरपालिका प्रशासन ऋषिकेश भालेराव, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शेळके आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मतदान केंद्रावरील व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक क्षेत्र, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी समन्वय राखून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात कशी पार पडेल यासाठी कार्य करावे,असे सांगितले.
सर्व मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. तेथून सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.
What's Your Reaction?