नवनियुक्त काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांचा 14 जूनला पदग्रहण सोहळा, "मैं नहीं हम" हि नवीन टॅग लाईन...!

 0
नवनियुक्त काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांचा 14 जूनला पदग्रहण सोहळा, "मैं नहीं हम" हि नवीन टॅग लाईन...!

14 जूनला नवनियुक्त काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम पदभार स्वीकारणार...नवीन टॅग लाईन "मैं नहीं हम"

छत्रपती संभाजीनगर, दि.11(डि-24 न्यूज)- काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम हे 14 जूनला दुपारी 2 वाजता आपल्या पदाचा पदभार शहागंज येथील पक्षाचे कार्यालय गांधी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साक्षीने स्विकारणार आहे. काँग्रेस पक्षाला शहरात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे म्हणून त्यांनी " मैं नहीं हम" हि नवीन टॅग लाईन देत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी गटबाजी सोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे लागेल असा इशारा अगोदरच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. "आपल्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांनी स्लोगन दिले आहे "संघर्ष जारी रहेगा, आवाज बुलंद रहेगी, और जनता का विश्वास फिर से काँग्रेस के साथ खडा होगा" शेतकरी, महीला, युवा व विद्यार्थी, छोटे व्यापारी, कामगार, श्रमीक, सरकारी, खाजगी नौकरवर्गाची ताकत म्हणून आवाज बनून काँग्रेस पुढे जाण्याचा संकल्प करत आहे म्हणून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पदग्रहण समारोह कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एड सय्यद अक्रम यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow