नवीन राज्य सरकार स्थापन होईपर्यंत साखळी आंदोलन स्थगित

 0
नवीन राज्य सरकार स्थापन होईपर्यंत साखळी आंदोलन स्थगित

नवीन राज्य सरकार स्थापन होईपर्यंत साखळी आंदोलन स्थगित

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) कुल जमाती विफाख मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे मागिल 31 दिवसांपासून विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे साखळी आंदोलन सुरू होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत हे आंदोलन नवीन राज्य सरकार स्थापन होईपर्यंत स्थगित करण्याची घोषणा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी केली आहे.

बाबा रामगिरी महाराज व नितेश राणे यांनी जे विवादास्पद वक्तव्य केली त्यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना आतापर्यंत अटकेची कारवाई करावी. वक्फ सुधारणा विधेयक - 2024 मागे घ्यावे. विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा बनवावा. औरंगाबाद शहराचे नाव पुन्हा तेच करण्यासाठी निर्णय घ्यावे. नवीन शहराला महानगरपालिका स्थापना करुन छत्रपती संभाजीनगर नाव द्यावे. या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. एका महीन्याच्या कालावधीत देशातील व राज्यातील विविध मान्यवर व्यक्ती व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी आंदोलनस्थळी सहभाग घेत पाठिंबा दिला. आचारसंहिता लागू झाली व पोलिसांनी परवानगी नाकारली व सांप्रदायिक तणाव होऊ नये यासाठी सरला बेट लाॅन्ग मार्च स्थगित करण्यात आला. हे आंदोलन अजून संपलेले नाही स्थगित करत आहोत. नवीन सरकारने मागणी मान्य केली नाही तर पुन्हा याच ठिकाणी आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुक आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राजकीय पक्षांनी वचन दिले आहे की निवडणूक जाहीरनाम्यात या मागणींचा उल्लेख करू ते वचन त्यांनी पूर्ण केले की नाही यासाठी विविध पक्षांच्या अध्यक्षांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. अहमदनगर व नाशिक पोलिसांनी बाबा रामगिरी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत काय तपास केला व काय कार्यवाही केली याचाही पाठपुरावा पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे उमेदवार मते मागण्यासाठी येतील त्यांना या मागणीची आठवण करून द्यावी व जाब विचारावा असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे. बाबा रामगिरी व नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी कामरान अली खान, एड खान सलिम खान, मेराज सिद्दीकी, हिशाम उस्मानी, शेख मोहम्मद मुनतजीबोद्दीन, मोहसीन खान, मोईद हशर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow