नागपूर येथे काँग्रेसच्या स्थापनेनिमित्त महासंमेलन, काँग्रेसने घेतली बैठक

 0
नागपूर येथे काँग्रेसच्या स्थापनेनिमित्त महासंमेलन, काँग्रेसने घेतली बैठक

काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिवसानिमित्त बैठक घेतली 

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) रविवारी पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या 139 व्या स्थापना दिवसा निमीत्त्त कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासंमेलन नागपुर येथे होणार आहे. त्या निमीत्त्ताने नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अ‍ॅड.मुजाहेद खान, जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

 यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलासबापु औताडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.आ.एम.एम.शेख, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मा.आ.नामदेवराव पवार, ओबीसी विभागाचे कांचनकुमार चाटे,अहेमद चाउस, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा हेमा पाटील, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा दिपाली मिसाळ, शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव गौरव जैस्वाल, जगन्नाथ काळे, अनिल सोनवणे, राहुल सावंत, उमाकांत खोतकर, मसरुर सोहेल खान, इंद्रीस नवाब, अनिता भंडारी, कृष्णा भंडारी, योगेश थोरात, जाफर शेख, निमेश पटेल, साहेबराव बनकर, विदया लांडगे, माधवी चंद्रकी, मुददसिर अन्सारी, सलीम खान, शेख फैयाजोदीन, श्रीकृष्ण काकडे, विनाकय सरवदे, नगमा सिद्दिकी, डी.एम.पाटील, अमजद खान,जंगले पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow