कचरा कामगारांनी हक्काच्या रोजगारासाठी महापालिकेच्या समोर केली निदर्शने
600 कचरा कामगारांनी हक्काचे रोजगारासाठी महानगर पालिकेवर निदर्शने केली.....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- 600 कचरा कामगारांना घन कचरा व्यवस्थापनात सामावून घ्यावे म्हणून कागद काच पत्रा कामगार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेवर निदर्शने करण्यात आली.
महानगरपालिकेच्या खाजगीकरणाचे धोरणामुळे या कचरा कामगारांना त्यांच्या हक्काचे रोजगारास मुकावे लागले. गेलेला हक्काचा रोजगार पुन्हा मिळावा म्हणून आजची निदर्शने होती, असे पत्रकात नमूद केले आहे.
दि.8 ते 24 जून 2026 राज्य शासन नियुक्त कुशाग्र संस्थेमार्फत व कागद काच पत्रा कामगार संघटनचे वतीने 11 प्रशिक्षण ( प्रत्येकी 50 - 55 कचरा कामगारांची....) शिबिर संपन्न झाले, त्याचा संपूर्ण तपशील महानगर पालिकेच्या घन कचरा विभागाकडे सुपूर्द केल्याचा उल्लेख निवेदनात केला आहे.
या सर्व कचरा कामगारांना महानगरपालिकेने ओळख पत्र देऊन, आपल्या घन कचरा व्यवस्थापनात सामावून घ्यावे अशी ठोस मागणी निवेदनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली.
हे कचरा कामगार वर्षानुवर्षांपासून , शहरात कचरा संकलन करून आपली उपजीविका भागवीत होते. मात्र महानगर पालिकेने कचरा संकलनाचे खाजगीकरण केल्यापासून या सर्व कचरा कामगारांना त्यांचे रोजगारास मुकावे लागले आहे.
परिणामी सर्व बेरोजगार कचरा कामगार, मिळेल त्या ठिकाणाहून कचरा संकलित करून, अर्ध पोटी जगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कचरा कामगारांचे प्रश्नात महानगर पालिकेचे महापौर व आयुक्तांनी विनाविलंब हस्तक्षेप करून, सर्व कचरा कामगारांना महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनात सामावून घ्यावे अशी विनंती आहे.
या प्रश्नावर दिवाळी झाल्यावर विस्तृत बैठक घेऊन निर्णय केला जाईल असे आश्वासन,. आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
आज महानगर पालिकेवर झालेल्या निदर्शनात कष्टकऱ्यांचे नेते साथी सुभाष लोमटे यांचे सह साथी आशाबाई डोके, साथी कविता दांडगे , साथी संगीता खंडागळे, साथी संगीता साळवे, साथी निर्मला साबळे, साथी वंदना मिसाळ, साथी विनीता जैस्वाल, साथी लक्षी दाभाडे, साथी विमल सदाशिव, साथी नंदा भदगे , साथी कचराबाई मनोहर, साथी कमलाबाई मोरे, साथी संवरिंग धीवर, साथी गोदाबाई खिल्लारे, साथी विशाखा पंडित गवई, तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेल्या साथी तारा मराठे, तसेच साथी देविदास किर्तीशाही , सुभेदार मेजर सुखदेव बन , साथी शेख खुर्रम, साथी प्रवीण सरकटे इ. ची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?